फेसबुक आक्षेपार्ह पोस्ट पाच मिनिटात काढणे शक्य

facebook
पुणे – सध्या सोशल मिडिया म्हणून फेसबुक भरपूर लोकप्रिय झाले आहे, बारीक -सारीक घटनांच्या प्रतिक्रियेपासून व्यक्तिगत जीवनातील बाबी फेसबुकवर शेअर केले जात असले तरी अनेकवेळा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने समाजजीवन बिघडण्याचे प्रमाणही वाढले आहे आणि पोलिसांनी तीच मोठी डोकेदुखी ठरत आहे पण पुण्यातील एका ग्रुपने त्यावर सोल्युशन शोधले आहे. फक्त रिपोर्ट स्पॅम करा आणि आक्षेपार्ह पोस्ट पाचच मिनिटात डिलीट होईल असे त्याचे स्वरूप आहे .

फेसबुकवर कोणी बदनामीकारक मजकूर किंवा छायाचित्र टाकले तर ते काढण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेललासुद्धा तब्बल चोवीस तास लागतात, पण तोवर या मजकुरामुळे व्हायचा तो वाईट परिणाम झालेला असतो. पण आता असा मजकूर तातडीने म्हणजेच पाच मिनिटांच्या आत हटविला जाणार आहे पुण्यातील पुण्यातील ‘एम्पॉवर फाउंडेशन’ने फेसबुकवर एका गटाची स्थापना केली असून ‘सोशल पीस फोर्स’ हा ग्रुप स्थापन केला आहे. विशेष म्हणजे त्याला सर्वच थरातून प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. फेसबुकवर कोणताही बदनामीकारक मजकूर वा छायाचित्र टाकले गेले, तर ते या ग्रुपद्वारे काढून टाकण्यात येऊ शकते . एखाद्या चित्राला किंवा मजकुराला १ हजार ६०० च्यावर लोकांनी ‘रिपोर्ट स्पॅम’ केले तर, ते फेसबुककर्त्यांकडून ५ मिनिटांच्या आत काढून टाकले जाते.

Leave a Comment