पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीला अॅप

pune
पुणे – स्मार्टफोनवर वापरता येईल असे देशातले पहिले वाहतूक मदतगार अॅप पुणे पोलिसांना आता उपलब्ध होणार आहे. या अॅपचे उद्घाटन बुधवारी पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या अॅपचा फायदा वाहन चालक, पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग असा सर्वांनाच होऊ शकणार आहे.

या विषयी बोलताना आयुक्त माथूर म्हणाले की पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. नव्या अॅपमुळे वाहन चालकाला वाहतूकीचा नियम मोडल्यास किती दंड भरावयाचा आहे याचीही माहिती कळणार आहे. तसेच पोलिसांना गाडीचा नंबर या अॅपमध्ये फिड केला की संबंधित वाहनचालकाने किती वेळा वाहतूक नियमाचे उल्लंघन केले आहे याची माहिती मिळणार आहे.

नागरिकांना वाहतूक नियमांची सर्व माहिती या अॅपवर मिळेल तसेच अतिमहत्त्वाचे सेवा फोन नंबर, वाहतूक पोलिस अधिकारींचे नंबर, ज्येष्टसाठी मदत केंद्रांचे नंबरही मिळू शकणार आहेत. चोरीस गेलेल्या गाड्यांच्या शोधासाठीही ते उपयुक्त आहेच पण प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही त्याचा उपयोग होऊ शकणार आहे. या अॅपमुळे बनावट वाहन परवाने नियंत्रणात आणता येणार आहेत. तसेच वाहतूक नियम मोडल्यास किती दंड भरायचा याची माहिती वाहनचालकाला मिळणार असल्याने वाहतूक पोलिसांचे लाच खाण्याचे प्रमाणही आटोक्यात येऊ शकणार आहे.

Leave a Comment