नोकरदारांसाठी “अच्छे दिन”; करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली

worker
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोकरदारांना करसवलतीमध्ये फार दिलासा दिला नसला तरी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून २.५ लाख रुपये केली आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी २.५ लाख रुपयांवरून वाढवून ३ लाख रुपये केली आहे. तसेच ८० सी अंतर्गत करता येणारी करबचतीसाठी गुंतवणुकीची मर्यादा दीड लाख रुपये करण्यात आली आहे. गृहकर्जावरील व्याजावरील करसवलत सध्याच्या दीड लाख रुपयांवरुन दोन लाख रुपये करण्यात आली आहे.

त्याचवेळी पीपीएफमधली गुंतवणुकीची मर्यादाही एक लाख रुपयांवरून वाढवून दीड लाख रुपये केली असल्याने जनतेने पीपीएफमध्ये गुंतवणूक करावी अशी इच्छा सरकारने बजेटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या तरतुदीमुळे सर्वसामान्य गुंतवणुकीच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार रुपये वाचवता येणार आहेत.

Leave a Comment