दोन तासांत होणार बालाजीचे दर्शन

balaji
हैदराबाद- सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २४-२४ तास रांगेत राहून दर्शन घ्यावे लागते. पण आता बालाजीचे दर्शन अवघ्या दोन तासांत होणार आहे. याबाबतची नवीन योजना महिन्याभरासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तिरुमला येथे खास सॉफ्टवेअर तयार केले आहे. या अंतर्गत प्रत्येक भाविकाला दर्शन मिळण्याची वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकाला वेळेपूर्वी केवळ दोन तास आधी रांगेत उभे राहावे लागेल, अशी माहिती आंध्रप्रदेशचे मंत्री प्यादिकोंडला राव यांनी दिली.

तिरुमला येथे तीन स्तरीय योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भाविकांना कोणत्या वेळी रांगेत उभे राहावे हे कळणार आहे. त्यामुळे भाविकांना विलंब टाळण्याबरोबरच अन्य स्थळे पाहता येऊ शकतात, असे राव यांनी सांगितले.

Leave a Comment