कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न

job
नोकरीच्या क्षेत्रामध्ये एक विलक्षण कोंडी झालेली आहे. आजच नव्हे तर पूर्वीपासून कमी-जास्त प्रमाणात ती तशी आहे. एखादा उमेदवार नुकताच शिकून बाहेर पडलेला असतो आणि कुठे तरी नोकरीचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो मुलाखतीला जातो तेव्हा सारे काही चांगले असल्याचे आढळते पण त्याला एक प्रश्‍न विचारला जातो की, तुम्हाला कामाचा अनुभव आहे का? तो उमेदवार नुकताच शिकून बाहेर पडलेला असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव नसतो. म्हणून त्याला ती नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नाही म्हणून अनुभव येत नाही. अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही. अशी ही कोंडी ङ्गोडून कुठे तरी अनुभव घेण्यासाठी नोकरी करावी लागते. ती सुद्धा मिळणे मुश्कील होते.

अशी कोंडी ङ्गोडण्याचा एक प्रयत्न सोलापूरच्या इंटेलीसॉफ्ट कॉम्प्युटर कन्सल्टंटस् या संस्थेने सुरू केला आहे. नुकत्याच शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले प्रॅक्टिकल ज्ञान आणि कामाचा अनुभव या दोन्हींचा समन्वय करून या संस्थेने एक्स्पीरियन्स डेव्हलपमेंट इंटर्नशीप प्रोग्राम आखलेला आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थी या संस्थेतच काम करेल. म्हणजे प्रत्यक्ष काम हाच त्याच्या ट्रेनिंगचा भाग असेल. अनुभव घेण्यासाठी नोकरी आणि इंटरर्नशीप या दोन्हींचाही समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. या काळात हे उमेदवार स्वत: सॉफ्टवेअर डेव्हलप करतील आणि कामाचा अनुभव घेतील.

सध्याच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत भरपूर गुण मिळतात परंतु सॉफ्ट स्कील्स्चा अभाव असल्यामुळे त्यांना नोकर्‍या मिळू शकत नाहीत आणि साधारणत: ही कौशल्ये निसर्गत: असतात, वातावरणातून निर्माण होतात किंवा संस्कारातून बाणले जातात असे मानले जाते. मात्र या तिन्ही कारणांनी ज्यांच्याकडे ही कौशल्ये नसतील त्यांच्यामध्ये ती निर्माण करण्याचा प्रयत्न या संस्थेत केला जातो. तेव्हा अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही अशा कोंडीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना इंटेलीसॉफ्टने एक आशेचा किरण दाखवलेला आहे. संपर्कासाठी पत्ता- www.intellisoft.co.in/ED असा आहे.

Leave a Comment