अंधांसाठी चक्क ‘अंगठी’ बोलणार !

ring
अमेरिका – मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी एक अफलातून अंगठी तयार केली आहे. ही अंगठी बोटामध्ये परिधान केल्यानंतर डोळ्यांची दृष्टी गमावलेली व्यक्तीही सहजपणे लिखित शब्द वाचू शकेल.

अंगठीचे बोट एखाद्या पानावरील लिखित मजकुरावर ठेवताच तिच्यातून कृत्रिम आवाजात संबंधित शब्द वा वाक्याचे उच्चारण होत राहील. या उपकरणाद्वारे व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा लेखी दस्तावेज समजून घेण्यास मदत मिळेल. अगदी दवाखान्यातील औषधांचे बिल असो वा हॉटेलमधील रेस्टॉरंटमधील मेन्यू कार्ड़ सगळे काही तो वाचू शकेल. आतापर्यंत अंध व्यक्ती फक्त ब्रेल लिपीचा वापर करूनच लेखन-वाचन करतात, मात्र या उपकरणामुळे त्यांना ब्रेल लिपीत उपलब्ध नसलेली पुस्तकेही ते वाचू शकतील. फिंगर रीडर नावाच्या या उपकरणामध्ये एक छोटा कॅमेरा बसविलेला असून तो लिहिलेल्या शब्दांचे स्कॅनिंग करण्याचे काम करतो. दुसरीकडे त्यातील एक खास प्रकारचे सॉफ्टवेअर बोटाच्या हालचालीवर नजर ठेवून शब्दांची ओळख करते व माहिती पुढे पाठविते. या उपकरणास एक मोटर जोडलेली असून ती पानावरून हात दूर होताच वाचकाला थरथरून इशारा देते.

Leave a Comment