२४ वर्षानंतर अर्जेंटिना अंतिम फेरीत

fifa
साओ पावलो – आपल्या संघाच्या विजयासाठी देवाचा धावा आणि गोल झाल्यानंतर किंवा रोखल्यानंतर मैदानावर पाठिराख्यांकडून होणारा जल्लोष अशा वातावरणात रंगलेल्या उपांत्यफेरीच्या दुस-या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने हॉलंडवर ४-२ ने मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

जगभरातील फुटबॉल रसिकांना अखेरपर्यंत श्वासरोखून धरायला लावणा-या या सामन्याने फुटबॉलच्या थराराची अनुभूती दिली. अर्जेंटिनाने तब्बल २४ वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरीत त्यांचा सामना जर्मनी विरुध्द होणार आहे. १९९० च्या विश्वचषकाच्या अंतिमफेरीत अर्जेंटिनाला नमवून जर्मनीने विश्वचषक जिंकला होता. यावेळी अर्जेंटिना या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आतुर असेल.

Leave a Comment