नवी दिल्ली : १३ जानेवारी २०१५ पासून मायक्रोसॉफ्टचा ऑपरेटिंग सिस्टीम WINDOWS 7 चा असणारा सपोर्ट बंद होणार आहे. WINDOWS 7 साठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर अपडेटस, सिक्युरिटी पॅचेस मिळण्यास बंद होणार आहे.
१३ जानेवारीला WINDOWS 7 चे शटडाऊन
यानंतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये हँकिंग किंवा वायरस अटॅक सुरक्षित राहणार नाही. मायक्रोसॉफ्टने लोकप्रिय ओएस विन्डोज एक्सपीसाठी एप्रिलमध्ये सपोर्ट करण्यास बंद केले आहे.
WINDOWS xp ज्यावेळेस सपोर्ट करण्यास बंद झाले तेव्हा खूप समस्या आल्या होत्या तशाच यावेळी देखील WINDOWS 7 सपोर्ट बंद केल्यानंतरही येणार आहेत.
जे कोणी प्रायव्हेट आणि सरकारी सिस्टम WINDOWS 7 वर काम करतात त्याच्यासाठी हॅक होण्याचा खूप धोका आहे. सध्यातरी फक्त मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार आहेत आणि एक्सटेंडेड सपोर्ट २०२० पर्यंत असणार आहे. मात्र एक्सटेंडेंड सपोर्टसाठी लोकांना पैसै द्यावे लागणार आहेत.
मेनस्ट्रीम सपोर्ट बंद होणार म्हणजे, अशा काही फ्री सर्व्हिसेस बंद होणे. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद झाल्यानंतर सिक्युरिटी अपडेटसना सोडून बाकी सर्व अपडेटससाठी यूजर्संना कंपनीला पैसा द्यावे लागतात.
WINDOWS xp चा मेनस्ट्रीम सपोर्ट १४ एप्रिल, २००९ला बंद झाला तर एक्सटेंडेंड सपोर्ट ८ एप्रिल २०१४ ला बंद झाला होता. कंपनी जेव्हा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करते तेव्हा सरकारी संस्थान ऑपरेटिंग सिस्टमशी जोडले गेलेले अपडेटस मिळविण्यासाठी तर काही वेळापर्यंत सुरु ठेवण्यासाठी कंपनीला पैसै देते, असं केल्याने कंपनीला आपल्या कॉम्प्युटर सिस्टम आणि सॉफ्टवेअर अपडेटसाठी काही वेळ मिळतो. याच कारणाने WINDOWS 7 मेनस्ट्रीम बंद झाली की ५ वर्षापर्यंत त्याचा एक्सटेंडेड सपोर्ट सुरु असेल.