भारतातील अमली पदार्थ हेरॉईनचा पुरवठा केवळ शेजारी देशांनाच नाही तर युएस व कॅनडालाही मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या यूएस वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०१४ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
भारत हेरॉइनचा पुरवठा करणारा मोठा देश
भारतात जे कमी दर्जाचे हेरॉईन बनते ते देशाच्या स्थानिक बाजारात विकले जाते तर उच्च दर्जाचे हेरॉईन पाश्चिमात्य देशांना पुरविले जाते असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून बांग्ला देश, श्रीलंका या दक्षिण आशियाई देशांना तसेच दक्षिण पश्चिम आशियातील देशांना हा पुरवठा केला जातो तसाच तो यूएस, युरोपमधील देशांनाही केला जातो. परदेशात जाणारे हेरॉईन प्रथम भारतात पाक सीमेवरून येते व नंतर ते अन्य देशांना पाठविले जाते. भारतात जगाच्या तुलनेत हे अमली पदार्थ खूपच स्वस्त विकले जातात. भारतात १ ग्रॅम पदार्थासाठी ९ ते १३ डॉलर दर आहे मात्र परदेशात ते १०० ते ४०० डॉलर्स प्रतिग्रॅम प्रमाणे विकले जाते.
भारतात अफूची लागवड करण्यास बंदी आहे मात्र देशात अनेक ठिकाणी अफूची अवैध लागवड केली जात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील १८ टक्के लोकसंख्या त्यातही १५ ते ६४ वयोगटातील लोक अमली पदार्थाचे सेवन करतात असेही समजते. पाश्चिमात्य देशांत अन्य अशियाई देशातून येणार्या अमली पदार्थांचा वाटा ४५ टक्के आहे तर भारतातून ५४ टक्के अमली पदार्थ येथे आणले जातात असे अहवाल सांगतो.