दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

exam
पुणे – दहावी आणि बारावीच्या २०१५ मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात येणार्‍या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने गुरूवारी जाहीर केले. या पत्रकानुसार यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०१५ ते २६ मार्च २०१५ या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०१५ ते २३ मार्च २०१५ या दरम्यान घेण्यात येणार आहे.

दहावीची परीक्षा ३ मार्च २०१५ ते २६ मार्च २०१५ या कालावधीत बोर्डाची परीक्षा होणार आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहेत. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी शाळा – कॉलेजमध्ये कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी असे बोर्डाने सांगितले आहे.

Leave a Comment