आणखी काही कोरडवाडू फळे

peru
आणखीही काही कोरडवाहू क्षेत्रातील ङ्गळे या भागातल्या शेतकर्‍यांना जीवदान देण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यात पेरू या पिकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पेरू हे ङ्गळ कमीत कमी पाण्यात येऊ शकते आणि त्याला मार्केटही चांगले मिळते. पेरूची विक्री करणे सोपे जाते. कारण ते लवकर खराब होत नाही. साधारण पक्व अवस्थेत आलेले पेरू तोडून लांब लांबच्या बाजारपेठात पाठविता येतात कारण ते पाच-सहा दिवस तरी खराब होत नाहीत. कोरडवाहू क्षेत्रामध्ये सीताङ्गळाच्या बरोबरच रामङ्गळाचेही महत्व आहे. कारण जेथे सीता असेल तेथे राम हवाच. असे असले तरी रामङ्गळ हे ङ्गळ सीताङ्गळाएवढे आवडीने खाल्ले जात नाही. त्याच्या मार्केटींगला काही मर्यादा आहेत. जांभूळ हे एक चांगलेच आवडीने खाल्ले जाणारे, मागणी असणारे आणि चांगले पैसे देऊन जाणारे कोरडवाहू ङ्गळपीक आहे. मात्र अजून तरी बोर आणि डाळींब यांच्या प्रमाणे जांभळाच्या बागा कोणी निर्माण केलेल्या नाहीत. मार्केटिंगची छान सोय झाली तर तसेही करता येईल.

रायगड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी जांभळाची वाईन तयार केलेली आहे. वाईन उद्योगांना संरक्षण देण्याची विधायक भूमिका सरकारने घेतली आणि त्यावरील कर कमी केले तर हा उद्योग वाढू शकतो आणि तसे झाल्यास जांभळाला मागणी येऊ शकते. जांभूळ हे ङ्गळ मधुमेहावर गुणकारी असल्याचे मानले जाते. त्यामुळे जांभळाच्या विविध प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारात खूप मागणी आहे. जांभळाच्या बियापासून सुद्धा मधुमेहावर गुणकारी औषध तयार केल्याचा काही लोकांचा दावा आहे. अर्थात तो डॉक्टरांनी मान्य केलेला नाही. पण भविष्यात हे औषध गुणकारी असल्याचे सिद्ध झाले तर जांभळाची मागणी वाढू शकते. जांभळाचा सिझन ङ्गार थोडा असतो. महिनाभरात तर जांभळे लागतात आणि संपूनही जातात. ते वाहतुकीला अवघड असलेले ङ्गळ आहे. मात्र त्याच्यावरही मात करून बरेच काही करता येते.

अशाच पद्धतीने आवळ्याचेही ङ्गळ उपयुक्त ठरणारे आहे. आवळा हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. आवळ्यामध्ये क जीवनसत्व आहे. त्यामुळे च्यवनप्राश सारख्या टॉनिकवजा औषधात आवळा हा मुख्य घटक असतो. आवळ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होऊ शकतात. आवळ्याचा मुरंबा, आवळ्याची कॅन्डी आणि आवळ्याची सुपारी असे सहज तयार करता येणारे अनेक पदार्थ आहेत. तेव्हा ज्या भागात पाण्याचे दुभिक्ष्य असेल त्या भागामध्ये आवळ्याचे पीक सहज येऊही शकते आणि शेतकर्‍याच्या उत्पन्नात भर घालू शकते. याशिवाय अजूनही काही उपयुक्त ठरणारी परंतु दुर्लक्षित असलेली कोरडवाहू ङ्गळे आहेत. त्यामध्ये कवठ, बेलङ्गळे, चारोळ्या यांचा समावेश होऊ शकतो. याबाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, महाराष्ट्रातल्या दुष्काळ प्रवण भागामध्ये राहणार्‍या शेतकर्‍यांना कोरडवाहू ङ्गळे ङ्गार वरदान ठरलेली आहेत. त्या ङ्गळांचा मागोवा घेऊन शेतकर्‍यांनी त्यांची कास धरली तर सातत्याने डोक्यावर असलेल्या दुष्काळाच्या टांगत्या तलवारीशी त्याला सामना करता येईल.

Leave a Comment