सोनीचा एक्सपिरीया सी ३ सेल्फी सादर

sony
सेल्फी वेड्यांसाठी सोनीने फ्रंट कॅमेर्‍याच्या सहाय्याने सेल्फी काढू शकणारा स्मार्टफोन सादर केला असून सोनी एक्सपिरीया सी ३ प्रोसेल्फी असे त्याचे नाव आहे. जगातील हा सर्वोत्तम सेल्फी असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा फोन पुढच्या महिन्यात प्रथम चीनमध्ये विक्रीसाठी दाखल होईल व त्यानंतर तो जगाच्या अन्य बाजारात आणला जाणार आहे.

या स्मार्टफोनला पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे हे याचे वेगळेपण आहे. त्याचबरोबर कॅमेर्‍याला २५ एमएमचा अँगल व सॉफ्ट एलइडी दिला गेल्याने हा फोन कोणत्याही प्रकाशात उत्तम सेल्फी काढू शकतो. शिवाय याला डबल क्लिक शटरही आहे. फोनला ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहेच शिवाय फ्रंट कॅमेर्‍याला दिल्या गेलेल्या वाईड अँगल मुळे मित्रमैत्रिणींसहही फोटो काढणे शक्य आहे.

या फोनला वाईन अॅप सुविधा दिली गेली आहे. यामुळे सहा सेकंदात व्हिडीओ रेकॉर्ड करून याच स्मार्टफोनमधून शेअर करता येणार आहे. पोर्टेट रिटच फिचरमुळे पिक्चर इफेक्ट, फोटो एडिटिंग करणेही शक्य आहे. तसेच टाईमशिफ्ट बर्स्ट फिचरमुळे दोन सेकंदात ३१ फ्रेम शूट करता येणार आहेत. ५.५ इंचाचा स्क्रिन, अँड्राईड किटकॅट व ८ जीबीची इंटरनल मेमरी ही त्याची अन्य वैशिष्ठे आहेत. फोनच्या किमती मात्र अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

Leave a Comment