समुद्रावर तरंगणाऱ्या गावाची रंजक कथा !

village
चीनमध्ये असे एक गाव आहे, जे वेगळे आहे. या गावाची खासियत म्हणजे ते शेकडो वर्षांपासून समुद्रावर तरंगत आहे. म्हणजे या गावातील प्रत्येक घर एखाद्या होडीप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते आहे. खरेतर हे गाव मच्छीमारांचे आहे. हे मच्छीमार ‘टांका’ नावाने ओळखले जातात. सुमारे सात हजार मच्छीमारांची कुटुंबे आपल्या पारंपरिक होड्यांपासून बनलेल्या तरंगत्या घरांमध्ये राहत आहेत. अशा विचित्र घराची तिथे पूर्ण वस्ती आहे. फुजियान प्रांतातील निंगडे शहरानजीक समुद्री मच्छीमारांची ही वस्ती आहे. या गावाची कथा मोठी रंजक आहे. शेकडो वर्षांपूर्वी टांका समुद्रातील लोक तिथल्या शासकांकडून होणार्‍या शोषणामुळे एवढे नाराज झाले होते की, त्यांनी समुद्रावरच राहण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये इ. स. ७00मध्ये तांग राजांची सत्ता होती. त्या काळी टांका समुदायाचाचे लोक युद्धापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी होड्यांमध्ये राहू लागले. तेव्हापासून त्यांना ‘जिप्सीज ऑन द सी’ असे म्हटले जाऊ लागले. हे लोक क्वचितच जमिनीवर येतात. इ. स. ७00पासून आजवर ते ना जमिनीवर येण्यास तयार आहेत, ना आधुनिक जीवनशैली स्वीकारण्यास. टांका प्रजातीच्या लोकांचे संपूर्ण जीवन पाण्याने वेढलेली घरे आणि मासेमारीवरच चालते. जमिनीवर जाण्याची गरज भासू नये यासाठी त्यांनी तरंगती घरेच नाही तर लाकडांच्या मदतीने छोटी छोटी तरंगती शेतेही बनवून घेतली आहेत. त्यात ते अन्नधान्य व अन्य भाजीपाला पिकवतात.

Leave a Comment