मातब्बर संघांत आज स्पर्धेतील दुसरी उपांत्य फेरी

fifa
साओ पावलो – मेस्सीची अर्जेन्टिना व रॉबेनची हॉलंड या मातब्बर संघांत आज फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत खेळवली जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार उत्तररात्री १.३० वाजता ही लढत होईल.

अंतिम फेरीत पोहोचलेली अर्जेन्टिना महान खेळाडू अल्प्रेडो डी स्टेफॅनो यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धमाकेदार विजय प्राप्त करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ८८ व्या वर्षी अल्पेडो यांचे सोमवारी निधन झाले. हॉलंडचा संघ यंदा सातत्याने हुलकावणी देत असलेल्या वर्ल्डकप जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्यानेच लढत देणार आहे. यापूर्वी १९७४, १९७८ व २०१० या तीन विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

डच संघाचा आधारस्तंभ डर्क क्युएत फिफाच्या वेबसाईटशी बोलताना म्हणाला की उपांत्य फेरीत खेळणे नेहमीच उत्साहजनक असते. पण, वर्ल्डकप पराभवाचे दुःख काय असते, ते आम्ही अनुभवले आहे. विजय मिळवणे हेच आमचे लक्ष्य असणार आहे. `अर्जेन्टिनाचा संघ जागतिक फुटबॉलच्या दर्जाला साजेसे योगदान देत आला आहे व उपांत्य फेरीत पोहोचणे त्यांच्या लौकिकाला साजेसे आहे. पण, आम्ही देखील इथे जिंकण्यासाठीच आलो आहोत’, याचाही डर्कने पुनरुच्चार केला.

Leave a Comment