ब्राझीलच्या नाकावर टिच्चून जर्मनीची अंतिमफेरीत धडक

germany
बेलो हॉरिझॉन्टे – जर्मनीने फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझीलचा सपशेल धुव्वा उडवत ब्राझीलच्या नाकावर टिच्चून जर्मनीची अंतिमफेरीत धडक मारली. जर्मनीने ब्राझीलचा ७-१ धुव्वा उडविल्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या ब्राझीलच्या स्वप्नांचा उपांत्य फेरीतच चुराडा झाला.

२००२ मध्ये ब्राझीलने जर्मनीचा २-० असा पराभव करून विश्वचषक आपल्या नावावर केला होता. ब्राझीलचे जर्मनीच्या आक्रमक खेळासमोर अक्षरशः पानीपत झाले. या सामन्यात थॉमस म्युलरच्या गोलने जर्मनीचे खाते उघडले. त्यानंतर जर्मनीने चार गोल डागून ब्राझीलची बोलती बंद केली. यामध्ये क्लोसाने १, टोनी प्रुसने २ आणि सामी खिदिराने १ गोल नोंदवले. उत्तरार्धात आंदे शुर्लेने आणखी १ गोल करून जर्मनीला ६-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

सामना संपायला शेवटची दोन मिनिटे असताना ऑस्करने ब्राझीलसाठी एकमेव गोल केला. या सामन्यात ब्राझीलला स्ट्रायकर नेमार आणि कर्णधार सिल्व्हाची उणीव प्रकर्षाने जाणवली. अंतिमफेरीत जर्मनीसमोर अर्जेंटीना आणि नेदरलँड यांच्यातील विजयी संघाचे आव्हान असणार आहे.

Leave a Comment