फळबागांमुळे स्थलांतरात घट

grapes
मराठवाडा हा दुष्काळी आणि मागासलेला भाग म्हणून ओळखला जात होता. दुष्काळ पडल्यावर मराठवाड्याचे ङ्गार हाल होतात. मराठवाड्यातले लोक पोटासाठी वाटेल तिथे जायला लागतात पुण्यात या भागातले लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेले आहेत पण आता गेल्या पाच सहा वर्षात मराठवाडयातल्या शेतकर्‍यांनाही ङ्गळबागांचे महत्त्व लक्षात आले आहे आणि त्यामुळे मराठवाड्याचे चित्र पालटायला लागले आहे. काही वर्षात मराठवाड्याला मागासलेला भाग म्हणून कोणी संबोधणार नाही इतका हा बदल ङ्गळांनी केला आहे. पूर्वी कोकणातला हापूस आंबा जगात प्रसिद्ध होता पण आता मराठवाड्यातल्या केसर आंब्याने त्याच्या बरोबरीने निर्यात करून परदेशी चलन मिळवून दिले आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीच्या बागा आहेत. जालना, औरंगाबाद, या जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात बोर आणि द्राक्षांच्या बागा वाढल्या आहेत. बीड जिल्यातली सीताङ्गळे अजून नीट मार्केटिंग करीत नाहीत पण ते केले तर त्यांनाही चांगला पैसा मिळू लागेल. गेल्या पाच सहा वर्षात नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांनी केळीच्या बागांत जळगावशी बरोबरी करायला सुरूवात केली आहे. मराठवाडा असा बदलत चालला आहे तो केवळ ङ्गळबागांमुळे बदलत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशीच स्थिती विदर्भाची आहे. विदर्भाच्या ज्या भागात संत्र्यांच्या बागा आहेत. तिथले शेतकरी बर्‍या स्थितीत आहेत. विदर्भात नेहमीच शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चा होत असते पण अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी द्राक्षाच्या बागांमुळे श्रीमंत झालेले आहेत.

अनेक शेतकरी पुण्या मुंबईत नोकरी करतात आणि गावाकडची शेती वाटेकरी किंवा गडी माणसांकडून करून घेत असतात. अशा रितीने उंटावरून शेळ्या हाकल्याने शेती होत नाही. अशा शेतकर्‍यांना शेती नीट करता येत नाही. धड शेतीतही पूर्ण वेळ लक्ष घालता येत नाही आणि धड नोकरीही सोडवत नाही. असे सात बारा वरचे शेतकरी नेहमी शेती कशी करावी या विवंचनेत असतात. त्यांच्यासाठी ङ्गळबागांची शेती चांगली ठरेल. द्राक्षा सारखी बाग त्यांना करता येणार नाही पण काही ङ्गळे नक्कीच अशी आहेत की त्यांना मालकाचे २४ तास समोर असणे गरजेचे नाही.विशेषत: आंब्याची बाग. तिला काही पूर्णवेळ शेतकरी असण्याची गरज नाही. नोकरी करून शेतात अशा ङ्गळांची बाग लावली तर तिच्याकडे लक्ष देता येते. याच संबंधाने दुष्काळी प्रदेशातल्या ङ्गळबागांचीही चर्चा केली जाते. महाराष्ट्राचा ४० टक्के भाग हा कायमचा दुष्काळ प्रवण आहे. तिथे कोणत्या वेळी दुष्काळ आपला दणका देईल याचा काही नेम सांगता येत नाही. अशा भागातल्या शेतीला काही अर्थच नाही. पण गेल्या काही वर्षात याही भागाच्या शेतीत तिथल्या वातावरणाशी अनुकूल अशा शेेती तंत्राचा विकास झाला आहे. या भागात कमीत कमी पाण्यावर येणार्‍या किंवा पूर्णपणे कोरडवाहू ङ्गळबागा उभ्या केल्या तरी या भागांची दुष्काळाच्या कचाट्यातून सुटका होऊ शकते असे दिसून आले आहे. चिंच,सीताङ्गळ, बोर, आवळा, कवठ, अशा अनेक कोरडवाहू ङ्गळबागांचे प्रयोग या भागात यशस्वीही झाले आहेत.

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे आजवर तरी ङ्गळबागायतीकडे ङ्गार लक्ष नव्हते. ते आता वळले आहे. मात्र तसा शेतकरीवर्ग ङ्गार छोटा आहे. आपण आपल्या शेतामध्ये कधीतरी ङ्गळबाग करावी, असा विचारसुद्धा मनात न आलेले अनेक शेतकरी राज्यात आहेत. त्यांना शेतीच्या अर्थशास्त्रातले ङ्गळांचे महत्व लक्षात आलेले नाही आणि आले असले तरी त्याविषयी अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. त्यामुळे ङ्गळबागायतीच्या वाट्याला न गेलेले शेतकरी जागोजाग दिसतात. शेतकरी स्वावलंबी आणि स्वाभीमानी व्हायचा असेल तर ङ्गळबागायतीला महत्व आहे. प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या शेताचा काही हिस्सा ङ्गळबागायतीखाली गुंतवलाच पाहिजे. मग त्यांनी कोणती का ङ्गळबाग केलेली असेना, पण पाच एकरातली एक एकर जमीन म्हणजे १/५ जमीन ङ्गळबागायतीखाली आली पाहिजे. ङ्गळबाग लावायची म्हटल्याबरोबर शेतकर्‍यांसमोर पहिला प्रश्‍न येतो तो जमीन पडून राहण्याचा. कोणत्याही ङ्गळझाडाला ङ्गळे लागायला काही कालावधी लागतोच. तोपर्यंतच्या काळात तेवढ्या रानातल्या पिकाला आपण मुकतो आणि तेवढी वर्षे ते नुकसान होते असे बर्‍याच शेतकर्‍यांचे म्हणणे असते. परंतु हा प्रश्‍न आता बर्‍यापैकी सुटलेला आहे.

पहिली गोष्ट म्हणजे ङ्गळांच्या लागवडीमध्ये एवढे संशोधन झालेले आहे की, दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षीच ङ्गळे लागणारी झाडे आणि त्यांचे वाण तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे ङ्गळबाग लावल्याने जमीन ङ्गार वर्षे पडून रहात नाही. एखादे दुसरे वर्ष आपले उत्पन्न बुडते. पण त्यानंतर मिळणारे जे उत्पन्न असते ते उत्पन्न कायमचे खात्रीशीर आणि आपल्या आर्थिक दृष्ट्या स्थैर्य प्राप्त करून देणारे असते. थोडक्यात सांगायचे तर आपला अडखळत चालणारा गाडा वळणावर आणण्याची ताकद ङ्गळबागायतीत असते आणि पुढे होणारे ते ङ्गायदे विचारात घेतले तर शेताच्या एका तुकड्यातले दोन वर्ष हाती न पडणारे उत्पन्न म्हणजे काही ङ्गार मोठे नुकसान नाही. त्यातच आणखी एक सोय झालेली आहे. बरेच शेतकरी शेतात ङ्गळे लावली असली तरी पहिली दोन-तीन वर्षे म्हणजे ङ्गळे लागेपर्यंतच्या काळात मिश्र पिके घेतात. ङ्गळांच्या झाडांची ङ्गार वाढ झालेली नसते, त्यामुळे ङ्गळबागेमध्ये कमी उंचीची कोणतीही पिके घेतली तरी ङ्गळबागेला काही नुकसान पोचत नाही आणि ङ्गळे लागेपर्यंतच्या काळातील उत्पन्न बुडण्याचा प्रश्‍नही सुटतो.

अशा सार्‍या तडजोडी होत असल्यामुळे ङ्गळबागायती करणे सर्वस्वी ङ्गायद्याचे आणि शेतकर्‍यांची अनेक प्रकारच्या अडचणीतून सुटका करणारे ठरत आहे. शेतकर्‍यांनी कोणती ङ्गळबाग करावी याचा निर्णय आपली जमीन, हवामान, पावसाचे प्रमाण आणि जवळपासची बाजारपेठ यांचा विचार करून घेतला पाहिजे. या संबंधात कोणाचा सल्ला घ्यावा, असा प्रश्‍न अनेक शेतकरी विचारत असतात. परंतु अशा प्रकारचा सल्ला देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे कृषी खाते आहे. आपल्या जवळच्या पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांशी याबाबत विचार विनिमय केला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकर्‍यांनी राज्यात प्रकाशित होणार्‍या कोणत्या तरी एखाद्या शेतीविषयक मासिकाचे वर्गणीदार झाले पाहिजे. महाराष्ट्र शासनाचे शेतकरी मासिक प्रसिद्ध आहे आणि ते सरकारी असल्यामुळे रंगीत छपाई असून सुद्धा अतिशय स्वस्त आहे. एकदाच वर्षाची किंवा पाच वर्षांची वर्गणी भरली की, आपल्या घरी पोस्टाने अंक येतो. अशाच प्रकारे अन्यही अनेक मासिके आहेत. त्यांचेही वर्गणीदार व्हायला हरकत नाही.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले बरेच शेतकरी आपल्या शेतीच्या उपयोगासाठी आवश्यक असणारी पुस्तके विकत घेत नाहीत. परंतु शेतीविषयक पुस्तके घरात असणे अतिशय ङ्गायदेशीर असते. आपण ज्या कोणत्या ङ्गळाची बाग लावण्याचे ठरवले असेल त्याचेवरचे एखादे छोटे मोठे पुस्तक अवश्य खरेदी करावे. त्यात त्या ङ्गळाविषयी सविस्तर माहिती असते. आपण शेतामध्ये लाखो रुपये गुंतवतो, परंतु या व्यवसायाच्या ज्ञानासाठी मात्र पुस्तकावर एकही पैसा खर्च करत नाही, हे काही बरोबर नाही. पुस्तके ही आपले खरे गुरू असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात.

Leave a Comment