पायलटने प्रवाशांना दिली पिझ्झाची मेजवानी

frontier
विमान प्रवासात तासन तास अडकून पडणे ही नित्याची बाब आहे. मात्र ताटकळलेल्या प्रवाशांना पिझ्झाची मेजवानी देऊन पायलटने खूष केल्याची घटना अपवादानेच घडते. फ्रंटीअर एअरलाईन्सच्या वैमानिकाने ही किमया केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या एअरलाईन्सचे विमान वॉशिग्टनकडे जात असताना डेनेव्हर येथील हवामान खराब झाल्याने चेयेन वोमिंग या आडवळणाच्या छोट्याश्या विमानतळावर उतरविले गेले. वेळ रात्री साडेदहाची. विमानतळावर खाद्यपदार्थांची सुविधा पुरेशी नव्हती. हे विमान त्याच्या नियोजित वेळेपेक्षा लेट उडाले होते व त्यातच हे विघ्न आले. दोन तास या विमानतळावर ताटकळण्याची वेळ आल्याने प्रवासी हैराण झाले होते इतक्यात पायलटकडून घोषणा झाली- लेडीज अॅन्ड जेंटलमन, फ्रंटिअर एअरलाईन्स ही अमेरिकेतील चीप एअरलाईन असली तरी विमानाचा पायलट मात्र चीप नाही. विमानातील क्रू सह सर्व प्रवाशांना पिझ्झाची मेजवानी पायलट देत आहे.

नुसते बोलून तो थांबला नाही तर डोमिनोज कडे ३५ पिझ्झा त्याने स्वतःच्या क्रेडीट कार्डवर ऑर्डर केले. त्यासाठी शिक्डो डॉलर मोजले. डोमिनोजने या आगळ्यावेगळ्या ऑर्डरचा आदर करून त्वरीत पिझ्झा तयार केले आणि विमानतळाच्या फ्रंट डेकवर धाडले. तेथून डोमिनोजची गाडी थेट विमानाकडे पाठविली गेली आणि विमानात बसल्याबसल्या प्रवाशांना गरमागरम पिझाची मेजवानी मिळालीही.

Leave a Comment