न्यायालयाचा भाभांच्या बंगल्याच्या हस्तांतरणास नकार

bunglow
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचा लिलावात विकत घेणाऱयांना देण्यास मनाई केली असून बंगल्याचे हस्तांतरण उच्च न्यायालयाने नकार दर्शविला आहे. मुंबई उच्च न्यायालयात बंगला खरेदी केलेल्या स्मिता क्रिष्ना गोदरेज यांनी या बंगल्याचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. ३७२ कोटी रुपयांना लिलावामध्ये मलबार हिल येथील हा बंगला खरेदी करण्यात आला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात बीएआरसीमधील दोन कर्मचाऱयांनी डॉ. भाभा यांच्या बंगल्याचे संग्रहालय करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी आज मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यावेळी खंडपीठाने बंगल्याचे हस्तांतरण करण्यास गोदरेज यांना नकार दिल्यामुळे डॉ. भाभा यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment