देशाच्या बँकांकडून अनक्लेम ५ हजार कोटी पडून

bank
मुंबई – देशाच्या विविध बँकात क्लेम न केलेली सुमारे ५ हजार कोटींची रक्कम पडून राहिली असून या रकमेला कोणीच दावेदार नाही. ३१ डिसेंबर पर्यंत अशा प्रकारे पडून राहिलेली रक्कम ५१२४ कोटी रूपये असल्याचे वित्त राज्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी दिले आहे.

१० वर्षे वा त्याहून अधिक काळ अनेक खाती बँकातून कोणत्याही व्यवहाराशिवाय आहेत. अशा हजारो खात्यातील ही रक्कम आहे. रिझर्व्ह बॅकेने वेळोवेळी सर्व बँकांना अशा अनऑपरेटिव्ह बँक खातेदारांचा शोध घेण्यात सक्रीय राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जी खाती विनाउपयोगाची राहिली आहेत त्यांची सची तयार करून वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे आदेशही दिले आहेत असे समजते.

Leave a Comment