चंद्रभागेस आला विठ्ठल भक्तीचा महापूर

pandharpur
पंढरपूर – पावलो पंढरी वैकुंठ भूवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥
टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यातून खळाळत वाहणारा विठ्ठल भक्तीचा प्रवाह आज चंद्रभागारूपी महासागरात विलीन झाला. आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह सुमारे 5 लाख वैष्णवांचा दळभार आज (मंगळवार) भूवैकुंठभूमी पंढरी नगरीत दाखल झाला. पंढरपूर नगरवासियांच्या वतीने संतांसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भयतीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पंढरी या भूवैकुंठ भूमीत आल्याने लाखो वैष्णवांना आजचा दिवस हा सोनियाचा वाटला. दरम्यान आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे.
इंद्रायणी तिराहून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, गोदावरी तिराहून श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज, कर्‍हा तिराहून श्री संत सोपानदेव महाराज, तापी तिराहून संत मुयताबाई यांच्यासह महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यातून अनेक संतांच्या पालख्या लाखो वैष्णवांसह काल (सोमवार) वाखरीत दाखल झाल्या होत्या. हा अतिभव्य दिव्य दुर्मिळ असा पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम वाखरी येथे होता. जिकडे तिकडे पताकांचे भार, टाळ, मृदुंगाचा निनाद, हरीनामाचा जयघोष व वारकर्‍यांची दाटी दिसून येत होती. वारकरी सांप्रदायाचे खरे वैभव येथे दिसून आले. या सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ लाखो भाविकांना येथे मिळाला. सकाळी 9.30 वाजता पालखी सोहळ्यावर राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आ.बबनराव पाचपुते व त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभा पाचपुते यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली. यावेळी लाखो वारकर्‍यांनी पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल या नामाचा जयघोष केला. दुपारचे भोजन व विश्रांतीनंतर वारकरी सांप्रदायाचा हा भक्तीप्रवाह आज पंढरीच्या दिशेने वाटचाल करू लागला. प्रत्येकाला विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी 1 वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडूरंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भयतीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पोलिसांनी वाखरी ते पंढरपूर या वाटचालीत रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळे तर डाव्या बाजूने सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याने दिंड्यांची सर्व वाहने पंढरीत वेळेवर पोहोचली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी हलयया पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी 6 वाजता इसबावी येथे पोहोचला. यावेळी चोपदारांनी उभे रिंगण लावून घेतले. पावसाच्या हलयया सरी अंगावर झेलीत वारकर्‍यांनी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. अश्‍वांनी तुकोबारायांना एक प्रदक्षणा पूर्ण करून पुन्हा रथाच्या अग्रभागी जावून पोहोचले आणि पुन्हा हा सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला.
श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरी मुयकामानंतर ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. त्यानंतर वडार समाजाने हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुययाची मुयतपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले. ज्ञानराजांचा पालखी सोहळा इसबावी येथे येताच मेघराजाने संतांसह वैष्णवांना जलाभिषेक घातला. पंढरी समीप आल्याने दिंड्या दिंड्यामध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला जात होता. तर काही दिंड्यात विविध खेळ खेळले जात होते. इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चोपदारांनी उभ्या रिंगणासाठी दिंड्या लावून घेतल्या. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण येथे मोठ्या उत्साही व भयतीमय वातावरणात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात देण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्यानंतर त्यांचे रूप अत्यंत मनमोहक व सुंदर दिसत होते. त्यांचे सुंदर रूप चंद्र, सूर्यापेक्षाही तेजस्वी दिसत होते. अंगकांती मेघाप्रमाणे निळी दिसत होती. वारंवार डोळे भरून त्यांचे रूप पहावे असेच वाटत होते.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत मुयताबाई, श्री संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या पालख्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, एस.टी.बसस्थानक, अर्बन बँक, नाथ चौकमार्गे रात्री पंढरीत मुयकामी पोहोचल्या. या सर्व पालखी सोहळ्यांसोबत महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यातून आलेला विठ्ठल भक्तीचा भक्तीसागर असलेल्या चंद्रभागेत विलीन झाला. त्यामुळे चंद्रभागेस विठ्ठल भक्तीचा महापूर आल्याचेच चित्र दिसत होते.
आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी व संतांचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे इसबावी येथे पालखी सोहळ्यात सहभागी झाले व त्यांनी संतांचे दर्शन घेवून पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.

पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी आज पहाटे विठ्ठलाची महापूजा करत ‘राज्यात भरपूर पाऊस होऊ दे, समृद्धी नांदू दे’ अशी प्रार्थना विठूरायाच्या चरणी केली. यावेळी केलेल्या रोषणाईने विठोबा रखुमाईचे मंदिर उजळून निघाले होते. लाखो वारकरी ही क्षणचित्रं डोळ्यात साठवून घेत होते. दरम्यान, कर्नाटकातील बिदर येथील रहिवासी असणा-या राम व प्रमिला शेळके हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. विठ्ठल मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार सुरेश खाडे, उपस्थित होते.

Leave a Comment