“एक व्हिलन”वर कारवाईची मागणी

ek-villian
मुंबई – एकता कपुरचा नुकताच पारदर्शित झालेल्या एक व्हिलन चित्रपटात मिरारोड परिसराचा उल्लेख रेडलाईट परिसर म्हणून करण्यात आल्यामुळे
बहूजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिरारोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून या चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चाहत्यांनी “एक व्हिलन” या चित्रपटाला चांगलाच डोक्यावर घेतल होत. मात्र, या चित्रपटात मिरा रोड परिसराचा रेड लाईट म्हणून उल्लेख केल्याने येथील रहिवाश्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी बहूजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

या चित्रपटावर त्वरीत कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही बहूजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Comment