नवी दिल्ली – देशातील दुसऱया माफक दर विमान सेवा कंपनी स्पाइसजेटने आपल्या विमान दरांमध्ये ५० टक्के कपात करुन आपल्या ग्राहकांना सुखद धक्काच दिला आहे. सदर सवलतीचा फायदा घेण्यासाठी उद्यापर्यंत तिकीट बुकिंग करता येणार आहे. पुढील वर्षी ६ जानेवारी ते २४ ऑक्टोबर २०१५ दरम्यान विमान प्रवास करण्यासाठी हे बुकिंग केले जात आहे.
‘स्पाइसजेट’मधून 999 रुपयांच्या बेसफेअरमध्ये घ्या भरारी
संसदेत केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही काळ अगोदर कंपनीने ही घोषणा केली आहे. ९९९ रुपये हे प्राथमिक बेस फेअर असेल आणि सर्व प्रकारचे कर त्यावर लागू केले जातील.
स्पाइसजेट कंपनीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एका महिन्यात ही तिसरी ऑफर दिली आहे. पहिल्यादा कंपनीने प्रमोशनल ऑफर अंतर्गत ऑफरमधील तिकिटांची संख्या जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर या ऑफरला ‘रेल्वेच्या भाड्यापेक्षाही कमी’ असे म्हटले आहे. ‘स्पाइसजेट’च्या पाठोपाठ इंडिगो, गो एअर या सारखी ऑफर देऊ शकतात.
बाजारात 20 टक्के भागिदारी असलेल्या ‘स्पाइजेट’ने 31 मार्चला 1,003.24 कोटी रुपयांच नुकसान झाल्याचे जाहीर केले होते. मागील आर्थिक वर्षात कंपनीला 191.07 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. कंपनीच्या तोट्यात जळपास पाच पटीने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी आकर्षक ऑफर दिल्या जात असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.