भिलाई – सोमवारी भारताचा माजी कसोटीवीर राजेश चौहानला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राजेश चौहानची प्रकृती स्थिर
भारतीय संघात अनिल कुंबळे, वेंकटपती राजू आणि राजेश चौहान या फिरकी त्रिकुटाने १९९० च्या दशकात चांगलाच धुमाकूळ घातला होता. ऍपोलो रुग्णालयात ४८ वर्षीय चौहानवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. १९९३ ते १९९८ या कालावधीत राजेश चौहान २१ कसोटी आणि ३५ वनडे सामन्यात भारताकडून खेळला आहे.