रंगेहाथ सापडला साईबाबांचे दागिने चोरणारा कर्मचारी

saibaba
शिर्डी- श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ट्रस्टच्या मंदिरातील देणगीत मिळालेले सोन्याचांदीचे दागिने चोरताना एक कर्मचारी रंगेहाथ सापडला.

दिनकर हनुमंत डोखे (५८) या कर्मचा-याकडे संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी तपासणी केली असता त्याच्याकडे एक ग्रॅमचे सोन्याचे नाणे, तीन ग्रॅमचे अन्य दागिने आणि ३६ ग्रॅम चांदीचे दागिने असा सुमारे १२ हजार रुपयांचा ऐवज लपवल्याचे आढळून आले.

पोलिस उपनिरीक्षक संदीप कहाले यांनी साईभक्तांनी केलेले दान ज्या मोजणी केंद्रात मोजले जाते, तेथूनच डोखे यानी हा ऐवज लपवल्याचे सांगितले.

संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात डोखे हे नोकरीला आहेत. साईबाबा संस्थानतर्फे शिर्डी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून डोखे याना निलंबित केल्याचे संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment