मुंबई- महिंद्रा समुहातील कंपनी महिंद्रा हॉलिडेज अॅन्ड रिसॉर्ट येत्या दीड वर्षात कंपनीच्या विस्तारासाठी ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे चेअरमन अरूण नंदा यांनी ही माहिती दिली.
महिंद्रा हॉलीडेज विस्तारासाठी ६०० कोटी गुंतवणार
महिंद्र हॉलिडेज कंपनीची प्रगती अतिशय चांगली असून कंपनीच्या रिसॉर्ट आणि हॉटेल्सना पर्यटकांकडून चांगली पसंती मिळते आहे. कंपनीकडे सध्या ही सेवा देणार्या ४१ मालमत्ता असून २५०० ते २६०० खोल्या उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद पाहता कंपनीला व्यवसाय विस्ताराची गरज भासते आहे. यामुळे ६०० कोटींची गुंतवणूक करून आणखी किमान ६०० खोल्या उपलब्ध केल्या जाणार आहेत असे नंदा यांनी सांगितले.