रियो दी जनेरो- ब्राझील फूटबॉल संघाचा स्ट्रायकर खेळाडू नेमार त्याला झालेल्या दुखापतीवरील उपचारासाठी भारतात केरळ येथे येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप फूटबॉल स्पर्धात कोलंबियाविरूद्धच्या सामन्यात खेळताना कोलंबियाचा डिफेन्डर खेळाडू कॅमिलो जुनिया याच्याबरोबर झालेल्या टकरीत जुनियाचा घोटा लागल्याने नेमार याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुढच्या सामन्यांतून तो खेळू शकला नाही.
ब्राझीलच्या नेमारवर केरळात उपचार?
एका टिव्ही चॅनलवरून प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तानुसार ब्राझील फूटबॉल फेडरेशनने केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नेमारवर आयुर्वेदिक उपचार करता येतील का अशी विचारणा केली आहे. मात्र केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी नेमारवर उपचारासाठी आम्हीच ब्राझील फूटबॉल फेडरेशनकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. केरळमधील तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांनी नेमारच्या दुखापतीबाबत इंटरनेटवरून माहिती घेतली असून त्याच्यावर येथे उपचार होऊ शकतील असे खात्रीपूर्वक सांगितले आहे.