बाळासाहेबांची संपत्ती उद्धव ठाकरेंनी बळकावली

balasaheb
मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण येत्या २५ ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात देण्याचे आदेश दिले आहेत.

जयदेव ठाकरे यांच्यावतीने न्यायालयात केलेल्या युक्तिवादात उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय ताकदीच्या बळावर बाळासाहेबांची सारी मालमत्ता बळकावली असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सर्व संपत्तीची सूत्र उद्धव यांच्याकडे आहेत. यावर आक्षेप घेत उद्धव यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मृत्यूपत्रानुसार संपत्तीची जबाबदारी सांभाळण्यास उद्धव सक्षम आहेत का? मृत्यूपत्राबाबतची संपूर्ण कल्पना बाळासाहेबांना होती का? १३ डिसेंबर २०११ च्या या मृत्यूपत्राबाबत बाळासाहेबांना पूर्ण कल्पना होती का? मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेब मानसिकदृष्ट्या पूर्ण तंदुरूस्त होते का? जयदेव ठाकरेंच्या दाव्यानुसार उद्धव ठाकरेंनी मृत्यूपत्रात फेरबदल केले आहेत का? असे काही प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत.
आता न्यायलयाने विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे बंधु काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment