पारंपारिक … ‘त्यांच्या’साठी कावळे करतात मासेमारी !

crow
जपान – मासेमारीसाठी वापरले जाणारे जाळे, गळ ही साधने आतापर्यंत तुम्हाला माहीत असतील, पण कावळ्यांकडून मासे पकडलेले कधी पाहिले आहे का ?विश्वास बसत नाही ना ! पण हे खरे आहे ,समुद्री कावळ्यांच्या पायाला दोरी बांधली जाते,मग मासेमारी सुरु होते. जपानच्या गीफूमध्ये मासेमारी केली जाते. तिथे समुद्री कावळ्य़ाच्या मदतीने मासे पकडले जातात. मच्छिमार रात्रीच्या वेळी या कावळ्य़ाना घेऊन नदीवर जातात आणि मासे पकडतात. जपानमधील मासेमारीच्या या पारंपारिक कलेला ‘उकाई’ आणि या कावळ्य़ांच्यामालकांना ‘उशो’ म्हटले जाते. हे उशो शिकारी रात्री नदीमध्ये मासेमारीसाठी लाकडे पेटवून प्रकाशनिर्मिती करतात. उकाई रात्रीच्या आधी कावळ्य़ांचे मालक आणि नाविक आगीच्या अवतीभोवती जमा होतात व रात्रीच्या वेळी मासे पकडण्याच्या पाटीमध्ये ठेवलेल्या समुद्री कावळ्य़ांना नावेत घेऊन नेले जाते. मासेमारी करताना या कावळ्य़ांना मजबूत दोराने बांधून ठेवले जाते. त्यांच्याकडून खास करून ‘आयू’ वा गोडमासे (स्वीटफिश) पकडले जातात. मासे पकडतेवळी कावळ्य़ांच्या चोचांमुळे त्यांच्या शरीरावर झालेल्या खुणा स्पष्ट दिसू शकतात. यासाठी खास पद्धतीने समुद्री कावळ्य़ांची निवड केली जाते.

Leave a Comment