अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याची मागणी

ramdas
नवी दिल्ली : पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आल्यानंतर रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

रामदास आठवले यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी जळगाव विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.