रेल्वे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सेन्सेक्स व निफ्टीत जोरदार घसरण

share1
मुंबई – लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअरबाजारात घसरण होत सेन्सेक्समध्ये 550 अंकांची आणि निफ्टीत 170 अंकांची घसरण झाली. रेल्वेशी संबंधीत शेअर्समध्ये मोठय़ाप्रमाणात घट झाल्याचे दिसून आले.

आठवडय़ाच्या दुसऱया दिवशीच्या सुरुवातीला अर्थसंकल्पात विकासात्मक पाऊल उचलले जाण्याच्या आशेने सेन्सेक्स 26,190 तर निफ्टी 7,800 वर पोहोचला होता. मात्र, सेन्सेक्समध्ये 517 अंकांची घट होऊन 25,582 वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये 163 अंकांची घट होऊन 7.623 वर बंद झाला.

Leave a Comment