महिला संचालक नेमण्यास कंपन्यांची टाळाटाळ

sebi
मुंबई- नोंदणीकृत कंपन्यांता किमान १ महिला संचालक बोर्डावर नेमली गेली पाहिजे या कंपनी कायदा आणि बाजार नियामक सेबीच्या नव्या नियमांचे पालन शेकडो नोंदणीकृत कंपन्यांनी अद्यापही केले नसल्याचे लक्षात आले आहे. ९०४ नोंदणीकृत कंपन्यांनी अद्यापी कोणत्याही महिलेची संचालक म्हणून नेमणूक केलेली नसून ज्या कंपन्यांनी अशा नेमणुका केल्या आहेत त्यांनी प्रमोटर कंपनीशी संबंधित महिलांनाच हे स्थान देऊ केल्याचेही दिसून आले आहे. नवा नियम १ आक्टोबर २०१४ पासून लागू होत आहे.

सेबीच्या फेब्रुवारीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता व त्याची सूचना सर्व नोंदणीकृत कंपन्यांना दिली गेली होती. ३० जूनपर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एनएसए वर नोंदणी झालेल्या १४९२ फर्म पैकी ६२ टक्के फर्मनी महिला संचालक नेमलेले नाहीत. तर रिलायन्स ने नीता अंबानी, किलोस्करने गौरी किलोस्कर अशा कुटुंबातील महिलांनाच संचालक म्हणून नियुकत केले आहे. एशियन पेंटस, गॉडफ्रे फिलिप्स, रेमंड या कंपन्यांनीही रिलायन्स व किलोस्करचाच कित्ता गिरविला आहे.

अपोलो हॉस्पिटल्सने मात्र चार महिला संचालकांची नेमणूक केली असून रेणू सूद या आठ पैकी पाच कंपन्यांच्या संचालक आहेत. ७४ कंपन्यांत प्रथमच ५९ महिलांची संचालक म्हणून नेमणूक केली गेली आहे.

Leave a Comment