‘नेओगुरी’ वादळामुळे जपानमध्ये जनजीवन विस्कळीत

neoguri
टोकियो : आज ‘नेओगुरी’ वादळाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे जपानचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवाई वाहतूकीसह रस्ते व जलमार्गाची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

‘नेओगुरी’ वादळ गेल्या दशकांमधले हे सर्वात शक्तीशाली वादळ असल्याचे बोलले जात असून या वादळामुळे जपानमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. येथील १ लाख ९० हजार नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. ओकिनावा द्विपावर प्रती सेकंद 50 मीटर पेक्षा अधिक वेगाने वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्यामुळे हजारो कुटूबांना वीजेपासून वंचित रहावे लागले आहे. वादळामुळे जपानमधील सर्व शाळा व बालवाडयासुध्दा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Leave a Comment