
गाजापट्टी – गाजापट्टी येथील इस्लामी दहशतवादी संघटना ‘हमास’चे वास्तव्य असलेल्या अनेक ठिकाणांवर इस्राईलने सलग दुसऱया दिवशी हवाई हल्ले केले. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत.
इस्राईलचे हमासच्या ठिकाणांवर हल्ले, नऊ जखमी
जवळपास गाजापट्टी येथील 30 ठिकाणांना लक्ष्य बनवत इस्राईलने हवाई हल्ले केले. यामध्ये दक्षिणी गाजापट्टीतील दोन घरांचाही समावेश असल्याची माहिती पॅलिस्टिनी अधिकाऱ्यांनी. हवाई हल्ल्यांनंतर ही घरे पुर्णपणे जमिनदोस्त झाली. हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील अनेक इमारती अगोदरच रिकाम्या करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही.
