आज होणार अंतिम फेरीसाठी झुंज

fifa
साओ पावलो – फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत १३ वेळा धडक मारणाऱ्या जर्मनीची टीम यजमान ब्राझिलसोबत आज फायनलसाठी झुंजणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वांच्या अनुपस्थित उतरणाऱ्या ब्राझीलसमोर जर्मनीचे मोठे आव्हान आहे.

विश्वचषकामध्ये स्टार स्टायकर नेमार शिवायच ब्राझीलला आता खेळावे लागणार आहे. त्यातच त्याच्या समोर जर्मनीसारखा आक्रमक आणि बलाढ्य संघ उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे यजमान ब्राझीलला धक्का देण्याचे मनसुबे जर्मनीच्या गोटात रचले जात असणार हे नक्की.

उप उपांत्य फेरीत नेमार दुखापतग्रस्त झाल्याने तो विश्वचषकामधून बाहेर झाला आहे. यामुळे या स्टार स्ट्रायकरविनाच ब्राझीलला आता आपली ताकद दाखवावी लागणार आहे. त्यातच कॅप्टन थियागो सिल्वालाही गेल्या मॅचमध्ये दुसऱ्यांदा यलो कार्ड मिळाल्याने तोदेखील या मॅचला मुकणार आहे.
आता नेमारच्या जागी विलियनला तर सिल्वाच्या जागी डान्टेला उतरवण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या गोटातही सगळे आलबेल नाही. जर्मनीही दुखापतग्रस्त मुस्ताफीविना मैदानत उतरणार आहे. जर्मनीचा थॉमस मूलर मोक्याच्या क्षणी आपली उपयुक्तता सिद्ध करु शकतो. तर गोलकिपर मॅन्युएल न्यूएरला भेदण्याचे प्रमुख आव्हान सांबा टीमसमोर असेल.

२००२ च्या फायनलनंतर या दोन्ही टीम्स प्रथमच वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने आल्या आहेत. त्यावेळी ब्राझील जर्मनीला २-० ने पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले होते. याशिवाय २००२ नंतर ब्राझीलने एकदाही होम ग्राऊंडवर पराभव स्वीकारलेला नाही.

आत्तापर्यंत या दोन्ही टीम्स २१ वेळा एकमेकांशी भिडल्या आहेत. यामध्ये जर्मनीने केवळ चार वेळाच विजय मिळवला आहे. तर ब्राझिलने १२ वेळा जर्मनीला धुळ चारली आहे. होम ग्राऊंड आणि इतिहासानुसार तरी ब्राझीलचे पारडे जड वाटत आहे.

Leave a Comment