शिकागो- रस्त्यांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात केलेले असतानाही शिकागोतील एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १४ जणांचा बळी गेला. तर १२ हून अधिकजण जखमी आहेत.
शिकागोत गोळीबार, १४ ठार, १२ जखमी
दोन जणांना ठार मारल्यानंतर पोलिस अधिक्षक गॅरी मॅककार्थी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन शनिवार- रविवारी सुट्टीच्या दिवसात अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी पोलिस विभाग सज्ज असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर काही तास उलटण्यापूर्वीच शिकागोतील रस्त्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला.
शिकोगोत डेट्रॉइट आणि न्यूयॉर्क भागात आतापर्यंत शनिवार- रविवारी अंधाधुंद गोळीबाराच्या ५३ घटना घडल्या. यात ४६ घटना गंभीर असून १० घटना भीषण हानीकारक ठरल्या आहेत.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नागरीक रस्त्यांवर आलेले असताना अशाप्रकारे दुर्दैवी गोळीबाराच्या घटना घडत आहेत आणि शेकडो पोलिस अधिकारी हतबल असल्याचे मॅककार्थी यांनी सांगितले.
चार जुलैला झालेल्या गोळीबारात आठ जणांचा बळी गेला. यात एका पोलिसाचा समावेश आहे. पाच घटनांमध्ये पोलिसांना गोळीबार करणा-या संशयितांना ठार मारण्यात यश आले.
सुट्टीच्या काळात २०१४ मध्ये ३३ गोळीबाराच्या घटना घडल्या. मागच्या वर्षी ३५ घटना घडल्या होत्या याची आठवणही मॅककार्थी यांनी करुन दिली.