रेल्वे मंत्रालयानेही घेतला सोशल मिडीयाचा आधार !

social-media
मुंबई: भारतीय रेल्वेच्या कारभाराचा वेग आता आणखी वाढणार आहे. कारण रेल्वे मंत्रालयानेही सोशल मिडीयाचा आधार घेतला आह. फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट उघडून रेल्वे मंत्रालयाची प्रत्येक गोष्ट जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

उद्या म्हणजेच 8 जूलै रोजी होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट ट्विटरच्या माध्यमातून लोकांना पाहता येणार आहे. रेल्वेमंत्रि सदानंद गौडा यांच्या हस्ते फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटचे ओपनिंग करण्यात आले.नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना सोशल नेटवर्किंगवर अॅक्टीव होण्यास सांगितल्यानंतर आता हळू हळू अनेक मंत्रि सोशल साईट्सवर पाहायला मिळत आहेत.आगामी काळात रेल्वे मंत्रालयाच्या सर्व अपडेट्स ट्विटर आणि फेसबुक यूजर्सला पाहायला मिळतील. मोदी सरकारचे सर्व मंत्रि आता सोशल साईटच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना पाहायला मिळतील.

Leave a Comment