मॅराडोनाला मागे टाकणार मेस्सी

messi
ब्युनास आयर्स : अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्‍व करंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यासाठी कर्णधार मेस्सी जेव्हा उतरेल त्याच क्षणी तो आपल्याच देशाचा विश्‍वविख्यात खेळाडू दिएगो मॅराडोना याच्या सर्वाधिक विक्रमी सामन्यांच्या संख्येला मागे सोडणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमविरुध्द उतरलेला मेस्सीचा तो ९१ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. याक्षणी अर्जेंटिनातर्फे सर्वाधिक १४५ सामने खेळण्याचा पराक्रम झेव्हियर जेनेटी (इटलीच्या इंटर मिलानचे उपाध्यक्ष) यांच्या नावावर आहे. त्याखालोखाल रॉबर्टो एला (११५), दिएगो सिमोन (१०६), झेव्हियर मास्केरानी (१०३), ऑस्कर रुगेरी (९७) आहेत.

Leave a Comment