महाराष्ट्र वन विकास महामंडळात १८५ पदे

fdcm
मुंबई – महाराष्ट्र शासनचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र वन विकास महामंडळात (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र) विविध पदांसाठी भरती होत आहे. चंद्रपूर तसेच नागपूर प्रदेश कार्यालायात १८५ पदे भरली जाणार आहेत.

चंद्रपूर प्रदेश कार्यालयात लिपिक पदासाठी २८ जागा, वन रक्षक ७७ जागा, वाहनचालक २१ जागा, चौकीदार २ जागा तर शिपाई पदासाठी २ जागा भरण्यात येणार आहेत.

नागपूर प्रदेश कार्यालयात लिपिक पदासाठी १५ जागा, वाहनचालक ७ जागा, वनरक्षक २३ जागा, निम्नश्रेणी लघुलेखक ३ जागा, शिपाई १ जागा आणी चौकीदार म्हणून ६ पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २२ जुलै आहे. अधिक माहिती www.fdcm.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.