फिफाच्या अंतिम स्पर्धेतील बॉल भारतात विक्रीला

fifa
रिओ डी जनेरो – आदिदास फिफा वर्ल्ड कप फूटबॉलच्या अंतिम सामन्यासाठी खास तयार करण्यात आलेला ब्राजुका फायनल रिओ नावाचा बॉल भारतातही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची किंमत आहे ७५९९ रूपये. आदिदासच्या सर्व दुकानातून हा बॉल मिळू शकणार आहे. या बॉलची लिमिटेड एडीशन काढण्यात आली आहे. वर्ल्ड कप फूटबॉलचा अंतिम सामना १३ जुलै रोजी होणार आहे.

आदिदासने या स्पर्धेसाठी तयार केलेल्या खास बॉलचे अनावरण नुकतेच करण्यात आले. ट्रॅफीचा झळाळता सोनेरी आणि हिरवा रंग यासाठी वापरण्यात आला आहे. गेल्या डिसेंबरमध्येच या बॉलचे अधिकृत अनावरण करण्यात आले होते. सध्या अनावरण केलेला बॉल हे त्याचे दुसरे व्हर्जन आहे. या बॉलच्या गेली अडीच वर्षे विविध चाचण्या घेण्यात येत होत्या. जगातील १० देशातील ३० संघानी आणि जगातील ६०० महान फूटबॉलपटूनी या बॉलची परिक्षा केली आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविले गेले आहेत त्यामागे या चेंडूचे खास डिझाईन कारणीभूत असल्याचेही सांगितले जात आहे. या बॉलवर नियंत्रण ठेवणे खेळाडूंना अधिक सोपे जात आहेच शिवाय या बॉलमुळे खेळाडूंना जादा स्पिनही मिळतो आहे. जगप्रसिद्ध फूटबॉलपटू डेव्हीड बेकमनचा हात बॉल स्पिन करण्यात कुणीच खेळाडू धरू शकत नव्हता. या बॉलला जादा स्पिन मिळत असल्याने यंदा जादा गोल नोंदविले गेल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment