दगडूशेठ गणपतीसाठी यंदा साकारतेय कैलास लेणे

dagduseth
पुणे – सप्टेंबरमध्ये सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाचे वेध पुण्यात आत्तापासूनच लागले असून शहरातील मुख्य गणपती मंडळात सजावटीची धामधूम सुरू झाली आहे. जगात नाव झालेल्या आणि लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी यंदा वेरूळच्या कैलास लेण्याची प्रतिकृती साकारली जात आहे. हे लेणे साकारण्याची अवघड जबाबदारी विवेक खटावकर यांनी घेतली आहे.

वेरूळचे कैलास लेणे हे एकाच खडकात कोरलेले अतिप्रचंड लेणे जगातील एकमेव स्थापत्य असल्याचे सांगितले जाते. हे सातमजली लेणे कळसापासून सुरू करून पायापर्यंत कोरले गेले आहे. १२ व्या शतकातील हे लेणे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून मान्यता पावले आहे.

दगडूशेठ गणपतीची स्थापना या वर्षी या लेण्याच्या प्रतिकृतीत करण्यात येणार आहे. त्याचे काम २८ मे पासून सुरू करण्यात आले असून ४० सुतार,१५ पेंटर आणि १६ फायबर ग्लासचे काम करणारे कामगार येथे अहोरात्र काम करत आहेत. ९० फूट लांब, ९० फूट उंच आणि ५२ फूट रूंद असे हे लेणे तयार केले जात असून ते पावणेदोन लाख दिव्यांनी झळाळून उठणार आहे. सात मजली कळस हे या लेण्याचे वैशिष्ठ आहे. मूळ लेणे पाषाणात कोरले असले ती ही प्रतिकृती लाकडात व फायबरमध्ये तयार केलीजाणार आहे.

Leave a Comment