व्हेल माशांच्या संख्येत होतेय घट

wheal
समुद्रात होणार्‍या हालचाली, कार्बनचे संचयन आणि मासेमारीसाठी पकडल्या जाणार्‍या माशांचे आरोग्य यांवर व्हेल मासे मोठय़ा प्रमाणावर व सकारात्मक प्रभाव टाकतात, असे एका ताज्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.

वर्मोंट विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ जो रोमन आणि त्यांचा चमू मागील अनेक वर्षांपासून जगभरात आढळून येणार्‍या व्हेल माशांच्या समुद्रावरील प्रभावाचे अध्ययन करत आहे. रोमन यांच्या माहितीनुसार, व्हेल्सचे अस्तित्व समुद्राच्या तंत्रावर फारसा प्रभाव टाकत नाही, असे बरेच दिवस असे समजले जात होते. पण या अध्ययनातून त्यास छेद मिळाला आहे. त्यांनी तयार केलेल्या एका अहवालानुसार, व्हेलच्या संख्येत ९0 टक्क्यांपर्यंत घट होत आहे, पण अजूनही त्यांचे अस्तित्व वाचविले जाऊ शकते. या दिशेने प्रयत्नही सुरू करण्यात आले आहेत. व्हेलला वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून समुद्राचे तंत्र सुधारण्यास त्यांची मदत घेतली जाऊ शकते. एक प्राचीन व प्रदीर्घ आयुष्य असलेली प्रजात म्हणून व्हेल समुद्राच्या पाण्यातील तंत्राबाबत पूर्वानुमान लावणे व त्याची स्थिती कायम ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हेलच्या बालीन व स्पर्म प्रजाती पृथ्वीवरील सगळ्य़ात प्राचीन जीव समजले जातात. समुद्रातील जवळपास सगळ्य़ात जीवजंतूना ते खातात. दुसरीकडे स्वत: मांसाहारी असलेले व्हेल व अन्य परभक्षी जंतूंचे भोजन बनते. अशा प्रकारे हा मासा समुद्रातील तंत्राच्या पोषणाला हातभार लावते.

Leave a Comment