पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विजयी

smith
डॉमिनिका – पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे विंडीजवर १२ धावांनी विजय मिळवित दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर विंडीजने १८ षटकांत ८ बाद १३२ धावा केल्या. न्यूझीलंडने त्यानंतर १५ षटकांत ४ बाद ११७ धावा जमविल्या होत्या. पावसाचा व्यत्यय व अंधूक प्रकाश यामुळे डकवर्थ-लेविसच्या नियमानुसार न्यूझीलंडला १२ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

विंडीजच्या डावात आंद्रे फ्लेचरने ३९ चेंडूंत १ चौकार, ४ षटकारांसह सर्वाधिक ५२ धावा जमविल्या आणि तोच सामनावीराचा मानकरी ठरला. ब्रॅव्होने ३०, पोलार्डने १६, सॅमीने १० धावा केल्या. १३ धावा अवांतराच्या रूपात मिळाल्या. न्यूझीलंडच्या साऊदी, बोल्ट, अँडरसन यांनी प्रत्येकी २, सौथीने एक बळी मिळविला. न्यूझीलंडच्या डावात कर्णधार मेकॉलमने ३५ चेंडूंत ४०, रॉस टेलरने २० चेंडूंत नाबाद २८, विल्यम्सनने १९ धावा केल्या.

Leave a Comment