नव्या इस्लामिक राष्ट्राचा स्वतंत्र पासपोर्ट जारी

isis
इराक आणि सिरीयातील कांही भागावर कब्जा करून आयएसआयएस संघटनेने हा भाग इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केल्यानंतर त्यांनी आपला स्वतंत्र पासपोर्ट जारी केला आहे. या पासपोर्टवर स्टेट ऑफ इस्लामिक खलिफा असे लिहिले गेले आहे. पासपोर्ट जारी केल्यानंतर या नव्या राष्ट्रचा खलिफा म्हणून घोषित करण्यात आलेला अबू बकर अल बगदादी प्रथमच एका व्हिडीओद्वारे जगासमोर आला आहे. या व्हिडीओतून खलिफाने जगातील सर्व मुस्लीमांनी त्याचे आदेश पाळावेत असा आदेश दिला आहे.

सौदी अरब वेबसाईट अल अरबिया वर या पासपोर्टची बातमी देण्यात आली आहे. पासपोर्टचा मजकूर अरबीत असून वरील भागात स्टेट ऑफ इस्लामिक खलिफा असा मजकूर असून खालील भागात या पासपोर्टधारकाला कोणताही त्रास होत असेल तर आयएसआयएस त्याच्या मदतीला येईल आणि त्याच्या सेवेत लष्कर तैनात केले जाईल असे आश्वासन दिले गेले आहे.

खलिफा अबू बकर ने जगभरातील मुस्लीमांनी नव्याने उदयास आलेल्या इस्लामिक राष्ट्रात यावे आणि इस्लामच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या लढाईत सामील व्हावे असे अपील केले आहे. विशेषतः इंजिनिअर, डॉक्टर व अन्य उच्चशिक्षित मुस्लीमानी देशसेवा करण्यासाठी नव्या राष्ट्रात यावे असेही आवाहन त्याने केले आहे. या भागातील ११ हजार मुस्लीमांना आता नव्या राष्ट्राच्या नावाने नवीन कागदपत्रे दिली जाणार आहेत.

Leave a Comment