तेल अवीव मध्ये चालणार स्काय कार

sky-car
तेल अवीव- इस्त्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीच्या परिसरात सध्या जमिनीपासून ५०० मीटर उंचावरून जाणार्‍या स्काय कारच्या चाचण्या घेतल्या जात असून या कार २०१५ पर्यंत प्रत्यक्ष वापरात आणल्या जाणार आहेत. या कार बनविणार्‍या स्काय ट्रेन कंपनीने नेटवर्कचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मुख्य रस्त्यांवर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या स्काय कार चालविल्या जाणार आहेत.

सध्या अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या परिसरात अशा स्काय कार वापरात आहेत. या कारमधून दोन प्रवासी प्रवास करू शकतात. टॅक्सीप्रमाणेच मोबाईल फोन वरून ही कार बोलविता येणार आहे. ताशी ७० किमी असा त्यांचा सध्याचा वेग असून एकदा का प्राथमिक चाचण्या यशस्वी ठरल्या की व्यावसायिक पातळीवर या कार चालविल्या जाणार आहेत. त्यावेळी त्यांचा वेग यापेक्षा अधिक असेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment