जोकोविच ठरला ‘चँपियन’

wimbldone
लंडन- अव्वल सीडेड सर्बियाच्या नोवाक जोकोविचने रॉजर फेडररचे ६-(७/६), ६-४, ७-६(७/४), ५/७, ६-४ आव्हान परतवून लावत विम्बल्डन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. तब्बल चार तास चाललेल्या प्रदीर्घ लढतीत फेडररने चुरशीची लढत दिली. मात्र ऑल इंग्लंड क्लबवर विक्रमी आठवे विम्बल्डन जिंकण्यात त्याला अपयश आले. गतउपविजेता जोकोविच २०११ नंतर पुन्हा ‘चँपियन’ ठरला.

फेडररने ‘टायब्रेकर’वर गेलेला पहिला सेट जिंकून आघाडी घेतली. मात्र त्यानंतर जोकोविचने दोन्ही सेट जिंकत सुरेख पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये एका क्षणी फेडररच्या सर्व्हिसवर त्याला ‘मॅचपॉइंट’ मिळाला होता. मात्र जिद्दी फेडररने पुन्हा खेळ उंचावत सेट जिंकला.

तसेच मॅच पाचव्या सेटवर नेली. या सेटमध्ये मात्र ३१ वर्षीय फेडररवर २७ वर्षीय जोकोविच सरस ठरला. फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या जोकोविचने विम्बल्डनच्या रूपाने यंदा पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले.

११ वर्षाच्या कारकीर्दीत दोनदा विम्बल्डन, चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन तसेच एकदा अमेरिकन ओपन अशी सात ग्रँडस्लॅम आपल्या नावे केलीत. मात्र जोकोविचला फ्रेंच ओपन अद्याप जिंकता आलेले नाही.

Leave a Comment