खडकावर वसलेले ट्रॉपिया शहर आजवर सुरक्षितच !

trapia
ट्रॉपिया : इटलीचे नाव घेताच रोम आणि वेनिस या शहरांची नावे आपल्यासमोर येतात. राजधानी रोम आपले अलौकीक सौंदर्य आणि प्राचीन संस्कृतीने परिपूर्ण आहे, तर वेनिस पाण्यात तंरगणार्‍या बेटासारखे पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले शहर आहे. इटलीच्या दक्षिण किनारपट्टीवर या शहरांप्रमाणेच वेगळी ओळख असलेले ट्रॉपिया नावाचे आणखी एक शहर आहे. या शहरात बहुतांश रिसॉर्टच आहे. उंच खडकाळ टेकड्यांवर बांधलेली ही रिसॉर्ट दूरवर पसरलेल्या किनारपट्टीपासून पाहिली जाऊ शकतात . कोणत्याही सामान्य शहराप्रमाणे तिथेही गल्लीबोळ व रस्ते आहेत. त्यावर पायी फिरून लोक सुट्यांचा आनंद घेत असतात. या शहराबाबत काही अख्यायिका आहे. १६३८मध्ये व्हर्जिन मेरी रोज एका पादरीच्या स्वप्नात येऊन या शहराला भूकंपाचा हादरा बसणार असल्याचा इशारा देत होती. रोजच असे स्वप्न पडू लागल्याने एक दिवस पादरी तिथल्या स्थानिकांना सहलीसाठी घेऊन अन्यत्र गेला. त्याच दिवशी भूकंप झाला. मात्र कुणालाही नुकसान पोहोचले नाही. दुसर्‍या महायुद्धावेळीही या शहरावर प्रचंड बॉम्बहल्ला झाला होता. तिथे सहा बॉम्ब टाकण्यात आले होते. या बॉम्बमुळे तिथे खोल खड्डे पडले, पण बॉम्ब मात्र आजवर फुटले नाहीत व शहर सुरक्षित राहिले.

Leave a Comment