कर्णधार तिवारी, ओझा यांची दमदार अर्धशतके

manoj
ब्रिस्बेन – सध्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर असलेल्या भारत अ संघाने चार दिवसीय सराव सामन्यात पहिल्या दिवसअखेर कर्णधार मनोज तिवारी (८३) व नमन ओझा (नाबाद ८२) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर ६ बाद ३०४ धावांची मजल मारली. ओझासमवेत धवल कुलकर्णी १२ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी भारत अ संघाने पहिले ३ फलंदाज अवघ्या ७३ धावांमध्येच गमावले होते. पण तिवारी व ओझा यांनी आक्रमक फलंदाजी साकारत संघाचा डाव सावरला. तिसऱया स्थानी फलंदाजीला आलेल्या जीवनज्योत सिंगने (५६) मनोज तिवारीसमवेत चौथ्या गडय़ासाठी १३४ धावांची भागीदारी साकारली. तिवारी बाद झाला, त्यावेळी भारत अ संघाच्या खात्यावर ५ बाद १९१ धावा नोंद होत्या. तिवारीच्या ११८ चेंडूतील खेळीत १२ चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. ऍलन बोर्डर मैदानावरील या लढतीत भारताने दिवसअखेर ८९ षटकात ६ बाद ३०४ धावांची मजल मारली.

Leave a Comment