आषाढी एकादशी;यंदा प्रथमच बडवे-उत्पात यांच्याविना महापूजा

vitthal
पंढरपूर – यंदा प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महापूजा ही बडवे-उत्पात यांच्याविना होणार आहे.

बुधवार दि.९ रोजी होणार्‍या आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्याच्या पुढे येणार्‍या भाविकांची संख्या अधिक असून, श्रीविठ्ठलाची पददर्शन रांग आठ पत्राशेड भरून पुढे गोपाळपूर पर्यंत गेली आहे. पददर्शनासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागत आहे. दरम्यान, यात्रा कालावधीत ७५ हजार भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग केले असून, दररोज ७ हजार भाविक याचा लाभ घेत आहेत. मंदिर समितीचे कर्मचारी विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या ठिकाणी नित्योपचाराचे काम पाहतात. १५ जानेवारी २0१४ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यंदा प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महापूजा ही बडवे-उत्पात यांच्याविना होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री १ ते १.३0 खासगीवाले पाद्यपुजा, १.३0 ते २.३0 नित्यपूजा, पहाटे २.३0 ते २.५५ भाविकांचे वतीने मुख्यमंत्री यांचे हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा होणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलला आहे. मंदिर व परिसरातील बारीक हालचालींवर लक्ष ठेवता यावे यासाठी ७२ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून मंदिर व परिसरात २४ तास वॉच ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी साधारणपणे १२ ते १३ भाविक विठ्ठल दर्शनासाठी आषाढी एकादशीला येत असतात.

Leave a Comment