सिल्व्हरस्टोन – ब्रिटिश ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद लेविस हॅमिल्टनने घरच्या मैदानावर पटकावले. र्सिडीजचा निको रॉसबर्ग व त्याच्यात केवळ चार गुणांचे अंतर राहिले आहे. हॅमिल्टनचे १६१ गुण झाले, तर रॉसबर्ग १६५ गुणांवर आहे. या मोसमात प्रथमच रॉसबर्गला शर्यतीतून अर्ध्यावरच निवृत्त व्हावे लागले.
हॅमिल्टन ठरला ब्रिटन ग्रां प्रिचा विजेता
यापूर्वी २००८ साली सिल्व्हरस्टोनमध्ये जेतेपद मिळविले होते. या मोसमातील अजून दहा शर्यती बाकी असून टायटल जिंकण्याच्या त्याच्या आशाही बळावल्या आहेत. हॅमिल्टनचे हे या वर्षातील पाचवे अजिंक्यपद आहे. फिनलंडचा विल्यम्सचालक व्हाल्टेरी बोटासने ३०.१ सेकंद जादा घेत दुसरे तर ऑस्ट्रेलियाचा रेड बुलचालक डॅनियल रिकार्डोने १६.३ जास्त घेत तिसरे स्थान मिळविले.