सेन्सेक्स झाला २६ हजारी

share
मुंबई – या आठवडयात सादर होणा-या अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराला मोठया अपेक्षा आहेत. उद्योगवाढीला अनुकूल निर्णय केंद्र सरकारकडून होतील अशी अपेक्षा असल्याने, सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच निर्देशांकाने पहिल्यांदाच विक्रमी २६ हजारांचा टप्पा ओलांडला.

निर्देशांक ११२ अंकांच्या वाढीसह २६,०७४ वर जाऊन पोहोचला. निफ्टीमध्येही २७ अंकांची वाढ होऊन निफ्टी ७,७७९ वर पोहोचला. परदेशी गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणावर केलेल्या खरेदीमुळेही निर्देशांकात वाढ झाली.

Leave a Comment